Friday, April 3, 2020

कंत्राटी कामगार वाऱ्यावर ; महिला बचतगटाने मदतीसाठी घेतला पुढाकार

निगुडे येथे तिलारीचे कंत्राटी कामगार वाऱ्यावर

मदतीसाठी महिला बचतगटाने घेतला पुढाकार

बांदा : असीम वागळे

          तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे कंत्राटी कामगार अन्नधान्य मिळत नसल्याने उपाशी फिरत होते. निगुडे गावठणवाडीतील महिलांनी ही बातमी समजताच महिला मंडळाने २५ किलो तांदूळ, गहू, कांदे, बटाटे, मसाला अशा अनेक जीवनावश्यक वस्तू संबंधित कामगारांना सुपूर्द केल्या.
          यावेळी महिला बचत गटाच्या सीआरपी श्रीम. रोहिणी गावडे, आशासेविका श्रीम. भाग्यलक्ष्मी मोरजकर, श्रीम. संजना गावडे, ग्रामसेवक श्रीम. तन्वी गवस यांनी कंत्राटी कामगार पर्यवेक्षक राजू राठोड यांच्याकडे सदर सामान पोच केले. तिलारी पाटबंधारे अंतर्गत कालव्याचे कामगार निगुडे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये राहत आहेत. एका कुटुंबात एका एक वर्षाच्या बालकासह एकूण ३१ कामगार येथे राहत आहेत.
          सदर कामगारांची नोंद सावंतवाडी तहसीलदार कार्यालय येथे देण्यात आली आहे. सर्व कामगार झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. निगुडे सरपंच समीर गावडे यांनी ग्रामपंचायतीचेवतीने जे काय सहकार्य पाहिजे असेल ते करू असे सांगितले. त्यानंतर श्री. गावडे यांनी संबंधित ठेकेदार यांना बोलावून कंत्राटी कामगारांना तात्काळ मदत करावी, अशा सूचना दिली.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.