इन्सुली गावातच बाजारपेठ उपलब्ध करून जिल्ह्यासमोर आदर्श
सावंतवाडी : असीम वागळे
कोरोना विषाणूच्या संसर्ग जगभर पसरला आहे. या भयावह संकटामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा देखील हादरला आहे. आज आपल्या जिल्हावासीयांना आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावात सरपंच श्रीम. पूजा दत्ताराम पेडणेकर यांच्या पुढाकाराने तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीसपाटील व लुपिन फाऊंडेशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने इन्सुली गावातच ग्रामपंचायतीच्या आवारात बाजारपेठ भरविण्याचा अभिनव उपक्रम राबविला.
सदर बाजारामुळे गावातील शेतकरी बांधवांचे भाजीपाला संबंधीचे होणारे नुकसानही टळले. त्याचबरोबर गावातील जनतेलाही रोजच्या रोज भाजीपाला उपलब्ध झाला. तरी सदर उपक्रमासाठी सरपंच श्रीम. पूजा पेडणेकर, उपसरपंच सदाशिव राणे, ग्रा. पं. सदस्य श्रीम. तपस्वी मोरजकर, श्रीम. उत्कर्षा हळदणकर, विठ्ठल पालव, श्रीम. साईली राणे, कृष्णा सावंत, श्रीम. राजश्री कोठावळे, महेश धुरी, श्रीम. समीक्षा गावकर, प्रभाकर पेडणेकर तसेच पोलीसपाटील श्रीम. जागृती गावडे यांचे सहकार्य लाभले. या अभिनव उपक्रमाचे संपूर्ण जिल्हास्तरावरून कौतुक होत आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.