Friday, April 24, 2020

जिल्ह्यात ३३८ व्यक्ती अलगीकरणात

जिल्ह्यात ३३८ व्यक्ती अलगीकरणात

विशेष प्रतिनिधी : अभय जाधव

जिल्ह्यात आज रोजी ३३८ व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी २७१ व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. तर संस्थात्मक अलगीकरण कक्षात ६७ व्यक्तींना ठेवण्यात आले आहे.

       जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मिरज येथे २२८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी २०९ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून १९ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. विलगीकरण कक्षात सध्या ६२ रुग्ण दाखल आहेत. तर आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी २२७७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

 लॉकडाऊनच्या काळात जिल्हा रुग्णालयामार्फत थालासेमिआचे १०, डायलेसिसचे ४२ व केमो थेरपीचा एक रुग्ण सेवा घेत आहेत. जिल्ह्यातील निवारा केंद्रातील २६४ व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे समुपदेशन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.