प्रतिनिधी : असीम वागळे
जिल्ह्यातील ४७ गावे व वाड्यांवरील पाणी टंचाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व कामांना स्थगिती देण्यात आली होती. पण आता पाणी टंचाईच्या कांमावरील स्थगिती उठविण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील ४७ गावांमधील पाणी टंचाईच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाई ग्रस्त भागाला दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.
दरवर्षी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईच्या कामांना सुरुवात होते. विशेषतः सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या वाड्या वस्त्यांमध्ये उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विहीर खोदणे, विंधन विहीर, विहीर दुरुस्ती, गाळ काढणे, विहीर खोल करणे , नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती अशा प्रकारची कामे हाती घेण्यात येतात. लॉकडाऊनच्या काळात ही कामे करणे शक्य होत नव्हते. पण, उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईचा विचार करता, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाईच्या कामांना सुरुवात करण्याविषयी जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. शासनानेही टंचाईची कामे सुरू करण्याविषयी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिलेल्या परवानगीने जिल्ह्यातील ४७ गावांमधील कामांना सुरुवात झाली आहे. त्यामध्ये ३३ विंधन विहिर दुरुस्ती, १३ नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती व १ पुरक नळ पाणी योजना ही कामे सुरू करण्यात आली आहे. यातील ९ गावांमधील विंधन विहीर दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. तर ५६ गावांमधील ४२ विंधन विहीर दुरुस्ती, १३ नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती व १ पुरक नळ पाणी योजना उभारणी या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. १२० कामे ही निविदी प्रक्रियेत असून त्यामध्ये ३५ विंधन विहीर दुरुस्ती, ८१ नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती, ४ पुरक नळ पाणी पुरवठा योजना यांचा समावेश आहे.
शहरी भागातील पाणी पुरवठ्याची परिस्थिती चांगली असून सध्या जिल्ह्यातील ८ नगरपरिषद क्षेत्रांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामध्ये सावंतवाडीला पाणी पुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरण व केसरी पाणी पुरवठा योजनेत १२ मीटर पाणीसाठा आहे. मालवण येथे धामापूर नळपाणी योजनेमध्ये ०.९४१ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ३८ टक्के पाणीसाठा आहे. वेंगुर्ला येथे नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेच्या निशान तलावामध्ये १ घनमीटर पाणीसाठा आहे. सध्या वेंगुर्ले शहरामध्ये एकदिवस आड या प्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कणकवली येथे नळ पाणी पुरवठा योजनेमध्ये ११ घनमीटर उपयुक्त पाणी साठा आहे. कुडाळला पाणी पुरवठा योजनेतील पावशी तलाव येथे बारमाही पाणी उपलब्ध आहे. कसई-दोडामार्गला पाणी पुरवठा करणाऱ्या मणेरी नदीमध्ये तिलारी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. वैभववाडी येथेही नळ पाणी पुरवठा योजनेसाठीचा पाणीसाठी बारमाही आहे. देवगड – जामसंडे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोताच्या ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध असून उन्हाळा अखेर पर्यंत उपलब्ध पाण्याचा शहरात पुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेने योग्य ते नियोजन केले आहे.
जिल्ह्यातील महत्वाच्या धरणांमध्ये तसेच लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये आजरोजी पुढील प्रमाणे पाणीसाठा शिल्लक आहे. तिल्लारी २७३.५७२ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ६१.१५ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्यम पाटबंधारे प्रकल्प असलेल्या देवघर प्रकल्पात ४१.५४५ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ४२.३८ टक्के, कोर्ले सातांडीमध्ये २३.६४२ द.ल.घ.मी म्हणजेच ९२.४८ टक्के, अरुणा प्रकल्पात २०.७९० द.ल.घ.मी म्हणजेच २२.५९ टक्के पाणीसाठा आहे. तर जिल्ह्यातील सर्व लघुपाटबंधारे प्रकल्पांमध्ये मिळणून ४८.०२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
एकूणच पाऊस वेळेवर सुरू झाला नाही तर जिल्ह्यात पाणी टंचाई जाणवण्याची परिस्थिती शहरी भागात नाही. तर ग्रामीण भागात मे महिन्यामध्ये पाण्याची कोणताही टंचाई जाणवू नये, यासाठी पाणी पुरवठा विभागाने योग्य ते नियोजन केले आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.