Tuesday, April 28, 2020

शासनाने शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात राहावे प्रयत्नशील

अन्यथा प्रति शेतकरी प्रति किलो ३०० रुपये द्यावी नुकसान भरपाई मनसे उपजिल्हाध्यक्ष दत्‍ताराम गावकर यांची मागणी





सावंतवाडी:-अमोल जाधव 

          कोरोना या आजारामुळे देशात सुरू असणाऱ्या लॉक डाऊन मुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातात आलेल्या मिर्ची पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे बांदा, सावंतवाडी, पेडणे, म्हापसा तसेच किरकोळ ग्रामीण खरेदीला ग्राहक नसल्याने कवडीमोल दर देवून विकण्यास हतबल झाला आहे.

त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना बाजारात जाण्यासाठी शासनाने सवलत द्यावी आणि त्याचे होणारे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत असून याला मनसे पाठींबा देत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना न्याय व बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी नाहीतर शासनाने प्रत्येक शेतकऱ्यास प्रती किलो ३०० रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मनसे उप जिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर यांनी केली आहे

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.