सावंतवाडी:-असीम वागळे
लॉकडाऊनच्या संकटामुळे गरजवंताला मदतीसाठी आज अनेकजण पुढे सरसावले आहेत.अशातच सावंतवाडी येथील संस्थांनचे युवराज लखम सावंत-भोसले यांच्याकडून कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत.राज घराण्याकडून अशा प्रकारच्या वस्तू देऊन आजच्या लोकशाहीच्या काळात सुध्दा माणुसकी जपण्यात आली आहे. यामध्ये युवराजांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे २५० किलो तांदूळ, ७०किलो पिठ, तेल तसेच डाळी यांचा पुरवठा केला तसेच लॉकडाऊनच्या काळात आपण संपूर्ण ताकदीनिशी सावंतवाडी वासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असेही त्यांनी सांगितले. तरी युवराज लखम सावंत भोसले यांच्या उदात्त कार्याचे तहसीलदार श्री राजाराम म्हात्रे यांनी मन भरून कौतुक केले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.