प्रतिनिधी : अभय जाधव
जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे आजपर्यंत एकूण २०८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यापैकी १७४ नमुन्यांचा अहवाल हा निगेटीव्ह आलेला आहे. तर अजून ३३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आज रोजी एकही पॉजिटीव्ह रुग्ण नाही.
जिल्ह्यात सध्या ४२३ जणांना घरीच अलीगकरण करण्यात आले आहे. संस्थात्मक अलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींची संख्या ६० इतकी आहे. तर विलगीकरण कक्षामध्ये आज रोजी ६० रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण २२३८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयामार्फत डायलेसिसची सेवा घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ती आता ४१ इतकी झाली आहे. तर खालासेमिआचे १० व केमो थेरपीचा १ रुग्ण जिल्हा रुग्णालयामार्फत सेवा घेत आहे. जिल्ह्यातील ६ निवारा केंद्रामध्ये असलेल्या २४२ व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.