Wednesday, April 22, 2020

गावठी हातभट्टीचा पर्दाफाश.....

गावठी हातभट्टीचा पर्दाफाश.....

पनवेल पोलिसांची कार्यवाही!!!




पनवेल:-अशोक सराफ

२१ एप्रिल रोजी रात्रौ ०२.३० वा. सुमारास पोलीस उपनिरीक्षक बाबर व पथकाने गोपनीय बातमीच्या आधारे पेठगाव, पनवेल येथील चाळीमध्ये जाऊन छापा घातला असता तेथे तिन इसम दोन खोल्यांमध्ये गॅसच्या शेगडीवर गावठी हातभट्टीची दारू तयार करत असताना आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच एक इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला व इतर दोन इसमांना ताब्यात घेतले.दोन्ही खोल्यात मिळून एकूण ३०० लिटर दारू काढण्याचे रसायन, ७लिटर तयार हातभट्टीची दारू, दोन गॅस सिलेंडर, दोन शेगड्या, २ चाटू असा ₹ १७,३००/- च्या मिळून आलेल्या मुद्देमालाचे सॅम्पल घेऊन इतर मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. तरी सदर कारवाईत अनंत बाळकृष्ण सुरते, वय-५७ व डांसर छोटू राठोड, वय-३८, दोन्ही राहणार पेठगाव, तालुका पनवेल व एका पसार आरोपीविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर १८२/२० भादंवि कलम १८८, २६९, २७०, २७१, २९० सह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५२ व महा. कोव्हिड-१९ उपाय योजना नियम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना अटक करून जामिनावर मुक्त केले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.