Tuesday, April 13, 2021

बाबासाहेब तुमच्यामुळे . . .

 


"महामानवाच्या जयंती निमित्त महामानवांना माझ्यातर्फे शब्दरुपी विनम्र अभिवादन ...!

 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

 

महाप्रचंड प्रज्ञा,

महाप्रचंड आवाका आणि महाप्रचंड जिद्द असलेला हा अद्वितीय महामानव!

जन्मजात लाभलेली प्रतिभा आणि परिश्रमाने कमावलेली विद्वता यांच्या बळावर तळातील माणूस शिखरावर कसा जाऊ शकतो???

याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच बाबासाहेब...! अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, कृषिशास्त्र, मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र, नीतीशास्त्रधर्मशास्त्र, घटनाशास्त्र अशा असंख्य  क्षेत्रातला महापंडित!

हा माणूस एकटा भारताचे सरकार चालवू शकतो, अशी मित्रांचीच नव्हे, तर विरोधकांचीही खात्री! 

संविधान, रिझर्व्ह बँक, चलनव्यवस्था, नियोजन आयोग, वित्त आयोग, निवडणूक आयोग  ही पायाभूत राष्ट्रयंत्रणा उभी करण्यात सिंहाचा वाटा!

हिराकूड - दामोदर - भाक्रानांगल  यासारखी अवाढव्य धरणं, भारतभरातील नद्या जोडण्याचा कार्यक्रम, राज्याराज्यातली वीज मंडळ आणि देशाच्या मध्यवर्ती वीज ग्रीडची स्थापना, कामगारांच्या आणि स्त्रियांच्या कल्याणाच्या सर्व योजनांचा प्रणेता, हिंदू कोड बिल मांडून स्त्री - पुरुष समतेसाठी तमाम धर्ममार्तंडांचा  आणि प्रस्थापितांचा रोष पत्करणारा योद्धा! दलित - शोषितांचा गगनभेदी आवाज! देशाला पुन्हा एकदा त्याचा गौतम बुद्ध नावाचा सर्वोत्तम पूर्वज आणि सर्वोच्च आयकॉन दाखवून भारतीयांना बोट धरून बुद्धिझम नावाच्या मेनस्ट्रीमकडे नेणारा युगप्रवर्तक! संस्कृतीकार!

राष्ट्रासाठी अहोरात्र कष्ट उपसणारा आणि राष्ट्रनिर्माता हे विशेषण सार्थपणे सिद्ध करणारा उत्तुंग राष्ट्रनेता ! 

न्यायस्वातंत्र्य, समता, बंधुतेचा महापुरस्कर्ता!

एका ग्रंथात न मावणारा हा बहुपैलू महामानव ग्रंथात पकडण्याचा केलेला हा एक प्रयत्न !

महामानवाला माझ्यातर्फे केलेले एक महाअभिवादन!


जयभीम 🇮🇳

जय महाराष्ट्र

जय भारत 🇮🇳

जय जगत🇮🇳

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

विश्वरत्न...

भारतरत्न...

२१व्या शतकातील सर्वोच्च बुद्धी सम्राट...!

महामानव डॉक्टर बाबासाहेबांची जयंती यावर्षी मी घरीच राहून साजरी करेन...

आपणांसही विनंती घरीच राहून बाबासाहेबांना नमन करुया

 व कोरोनारुपी राक्षसाला हरवूया......

🤝🤝🤝🤝

जय भीम...

जय शिवराय...

नमो बुद्धाय ...

🤝🤝🤝🤝🤝

मित्रहो....

जगातील असा एकमेव विद्यार्थी ज्यांचा जन्मदिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो..

त्यांची उद्या जयंती...

ज्यांच्या Problem of Rupee या पुस्तकातून R.B.I.ची स्थापना झाली.. 

त्या अर्थतज्ज्ञाची आज जयंती...!

जगातील १५० देशात ज्यांची जयंती साजरी केली जाते त्या युगपुरुषाची आज जयंती..

जो विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसून शिकला अन् भारतासारख्या महान देशाची घटना लिहिली त्या घटनाकाराची आज जयंती...

असा एकमेव नेता ज्यांची  गावागावात जयंती साजरी केली जाते त्या युगपुरुषाची आज जयंती,...

जगातील एकमेव व्यक्ती ज्यांनी ग्रंथांसाठी घर बांधले, त्या ग्रंथप्रेमीची आज जयंती..!

ज्यांचे वादविवाद ऐकण्यासाठी शहरातील लोक न्यायालयात यायचे त्या विद्वान बॅरिस्टरांची आज जयंती..!

गेल्या ३०० वर्षातील एकमेव *जागतिक विद्वान* म्हणून ज्यांची विश्वाने निवड झाली त्या प्रकांडपंडित बाबासाहेबांची आज जयंती...!!!

*ही जयंती करु आपण घराघरांत..*

*बाबासाहेब आमच्या मनामनांत....*

*Stay @ home..,*

*Stay safe...,*

*Go Corona....*

प्रा. रुपेश पाटील

विद्याविकास अध्यापक विद्यालय,

आजगाव, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग मोबा. ७९७२७७५४५९, ९४०४७३७८९३

📧 rupeshypatil199@rediffmail.com

📧 dhulenirupmann2011@gmail.com

(शिव-फुले-शाहू-आंबेडकरी व्याख्याता)

पुरवणी संकलन : आयु. कृष्णा महादेव तुळसकर 

_________________________________________________________

कृष्णा तुळसकर
संकलन : कृष्णा तुळसकर
 




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.