Thursday, May 14, 2020

विश्वदु:खाचे दाट भय ... अनिल जिजाबाई तुकाराम सरमळकर.

भिंत खचली कलथून खांब गेला 
जुनी पडकी उध्वस्त धर्मशाळा
तिच्या कौलारी बसून पारावा तो 
खिन्न निरस एकांत गीत गातो 

            ------  बालकवी .

विश्वदु:खाचे दाट भय ...

       ---- अनिल जिजाबाई तुकाराम सरमळकर.

कपोलकल्पित विनाशकारी कल्पना प्रत्यक्ष सत्यात उतरल्यावर मानवी जिवनाची जी वास्तविक भयकारक अवस्था होवु शकते त्या अवस्थेत सारे जग आज सापडले आहे.. संपूर्ण विश्व समान दु:खाच्या पातळीवर आले आहे.. केवळ कथा नाट्य चित्र शिल्प आणि रूपेरी पडद्यावर मुर्त अमूर्ततेने साकारला जाणारा  प्रलय महाप्रलय आज अगम्य आणि अंत माहिती नसलेल्या शोकात्मिकेसारखा आज वास्तवात समोर ठाकला आहे..
जगाच्या इतिहासात प्रथमच !! 

कोरोना विषाणूने जे हे विश्वमहाभय आणि मृत्यूचे जाळे 
आपल्यावर फेकले आहे त्यात मानव सैरभैर झालेला आहे.. इथे ज्येष्ठ कवी निदा फाजली यांच्या ओळी आठवतात ...

" रात और दिन के बीच 
  अभी सपना जिंदा है 
  मरी नही अभी तक 
  यह दुनिया जिंदा है ...

पण कवी श्रीकांत वर्मा यांचे शब्द या बदलत्या वास्तवाला अजुन मानवच जबाबदार आहे अस सांग्तात श्रीकांतजी म्हणतात ..

" वे केवल कुश प्रश्न शोड गये है 
जैसे की यह ---- 
कोसल अधिक दिन नही टिक सकती 
कोसल मे विचार की कमी है .... 

मानवी समाजाने आजवरच्या शोषण गुलामगिरी..
सरंजामशाही.. दोन महायुद्ध.. शीतयुद्ध.. वांशिक हत्याकांडे.. भांडवलशाही.. वसाहतवाद.. संब्राज्यवाद 
वर्णवाद.. जातीवाद आणि कित्येक धर्मयुद्ध....
यामधे मानवी समाजाने आपल सर्वस्व गमावूनही 
मानवी समाज सिसिफस सारखा पुन्हा पुन्हा उभा राहीला.... 

शोषण नित्य असुनही मानवी समाज जगत असतानाच 
एका बेसावध क्षणी कोरोनाने पुर्ण जगाला गाठले आहे..
समोर शत्रूच नाही ... अदृष्य शत्रू... तरिही प्राणपणाने त्याच्या विरूध्द आम्ही लढतो आहोत... 
खरच.. कोरोना योध्यांचा विजय असो.. !!!!

काळ देहासी आला खावु ...

प्रकर्षाने इथे संत नामदेव आठवतात..

आणि मग आधुनिकतेचा अंत होवुन जग उत्तर आधुनिकतेच्याही पलीकडे गेलय हे सांगताना 
उत्तर मानव काळ सुरु झालाय असे सांगणारे
उत्तर आधुनिकतावादी हे भय आणखी गहीरे आणखी दाट करतात... 

गोस्ट अजुन संपली नाही 
अचुक गोस्टी बाकी आहेत ..

फैसला अजुन बाकी आहे 

इतिहासाचा अंत झाला आहे असे जाहीर करणारा 
खतरनाक उत्तर आधुनिक विचारवंत फ्रांसिस फुकियामा 
त्याने आपला प्रबंध मांडला तेव्हा विश्वविचार साहित्य वर्तुळात एकच खळबळ माजली होती..

तर एका ठिकाणी अत्यंत महत्त्वाचे उत्तर आधुनिक विचारवंत मिशेल फुको म्हणतात..

""सागराच्या किनाऱ्यावर रेतिने बनवलेल्या चेहऱ्याप्रमाणे 
मानवाचे नामोनिशाण मिटुन जाईल ... ""

या जागतिक शोकांतिकेची चाहुल लागूनही मानव सजग का होत नाही ? 
फुकियामा याना काय म्हणायचे होते ? 
इतिहासाचा अंत म्हणजे नेमके त्यांचे काय prediction होते ? ... अर्थातच आधुनिक जगातला इतिहास हा प्रस्थापित सांब्राज्य्वद्यानी लिहिलाय.. त्यात वंश वर्चस्व आणि त्यांचे हितसंबध आहेत.. अर्थातच युरोप अमेरिकेचे 
आणि त्या इतिहासात others सामान्य लोकांचे शोषित जगाचे स्थान नाही.. आधुनिक जगाने दिलेली सर्व वचने खोटी आहेत ... तो इतिहास वैराचा.. कत्तलीचा.. भेदाचा आहे.. तो विकृत आहे.. तो इतिहास वैर निर्माण करेल..
प्रेरणा घ्यावे असे काही नाही त्यात... आणि म्हणुन तो आता संपायला हवा... नवे जग.. अर्थातच उत्तर आधुनिक जग निर्माण करण्यासाठी ....

माय गॉड.. भारतीय बुद्धीवाद्याना काय पडलय फुकियामा च  ? 
ते आपल्याच कोशात आणखी खोल आध्यात्मिक जाळी विणत राहतात ...

फुकियामा यांच The end of history याच इथ काय संबंध असे म्हणाल.. सांगतो ..
१९८९ च्या या प्रबंधात फुकुयामा सांगतात की इथुन पुधे विचार होत रहतील त्याचा इतिहास असेल.. देश.. राष्ट्रवाद.. धर्मवाद .. आयडियालॉजीज भूगोल आणि प्रस्थापित हितसंबधीय संस्कृती हे सर्व काल्बाह्य ठरेल ...

पण वैराचा इतिहास सांब्राज्य्वाद्यानी संपु दिला नाही..
हिटलर संपला.. चिनमधील माओ पर्व लयाला गेले..
बर्लिनची भिंत पडली.. जणु की कमुनिझम समाजवादाचे 
खांबच पोखरले गेले .. आणि मग सोविएत रशियाचे विघटन ... 
आणि शित युध्दाच्या दिर्घ काळात अमेरिकेने रशियाला उध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने जंग जंग पशाडले 
सीआए आणि केजीबी या अमेरिका आणि रशीयाच्या हेर खात्यानी घडवून आणलेली कित्येक कट कारस्थाने....

आणि बनवली गेलेली जैविक रासायनिक अस्त्रे ...

इथे इथेच खरी मेख आहे ..
मानवी अंताची हीच भयप्रद वाट ....

आणि मग मुक्त अर्थ व्यवस्था मुक्त नव भांडवलशाहीला मोकळे रान ... 
फुकुयामा यांच्या The end of history ला काही वर्षे 
झाली असतानाच जगभर पुन्हा जागतिक दहशतवाद उफाळून आला.. त्याची मुळे धर्मवेडातच आहेत ..
अस्मिता इगो मग वेडात रुपांतरीत होतो... या दहशतवादाचा वापर अमेरिकेने शितयुद्धाच्या काळात स्वतःसाठी रशियाच्या विरोधात केला.. तेच दहशतवादी जेव्हा अमेरिकेच्या गळ्यावर सुरी ठेवु लागले तेव्हा तिने त्याना संपवल... पण ... दहशतवाद संपला नाही...

आज तो वेगवेगळ्या रुपाने वेगवेगळ्या पॅटर्नने जगभर आहे.. आणि त्याच्याकडे अत्याधुनिक आणि अत्यंत घातक जैविक अस्त्रे आहेत ....

काय घडतय.. आज आपण तिसऱ्या जैविक महायुद्धाचा तर सामना करत नाही ना ..?

गो पु देशपांडे यांच्या  " उध्वस्त धर्मशाळा  ' या मराठीतील ग्रेट नाटकात एक संवाद आहे ..

 "" मार्ग उमजला की मरण सोप होत ! "" 

या समग्र आणि अखंड वाताहतीत आज माणसाला
मार्ग ही उमजत नाही आणि मरण तर ठेत चेस्टा करु लागलय ....

अमेरिका जरुर मानवी स्वातंत्र्याचा घोष करणारी आहे ..
अचाट ताकदवरही आहे ... पण या इथवर पोहोचण्यासाठी अमेरिकेने माती खाल्लीय इतिहासभर..
कित्तेक हत्याकांड आणि शोषणाचे कधीही माफ करता येणार नाही असे गुन्हे केले आहेत अमेरिकंस्नी....

चिनचा हा महा भयानक ड्रॅगन अमेरिकेच्या रक्ताला चटावला तर नसेल ? आणि मग आमचही रक्त आवडतच की त्याला ... !!!! 

एक लेखक म्हणुन हे माझे अंदाज आहेत.
 उत्तर आधुनिक समाज म्हणजे नुसता तमाशा नाही ..
एकदम ठायलयीत्तल गाणेही नाही ... 

भैरवी आहे ती ... तीही हाय पीच मधली ...

आधुनिकतेच शेवटच शोकात्म गीत आहे ते 

झॅक देरेदाने जे आव्हान युरोपीय तत्वज्ञानाला दिल होत 
ते पेलल नाही युरोपला..  ग्रीक पासुन भारतातील प्रस्थापीत तत्वज्ञानाला त्याने आव्हान दिलेय आणि ते डिकंस्टृक्टही केलेय ...

सांस्कृतिक मर्यादा असुनही त्या त्या देशातील बल्वत्तर सत्तानी आपलेच सांस्कृतीक आणि राजकीय हितसंबध जोपासले ... अगदी वैचारीक खुलेपणासाठी ओळखली जाणारी अमेरिकासुद्धा याबाबत तुसडी वागली...
कारण एकच सुसाट अमेरिकन भांडवलशाहीसाठी आणि तिच जगावर वर्चस्व रहाव यासाठी ....

या उन्मत्ततेत त्यानी Others जगामधे कधीच जन्माला आलेले वणवे पाहिलेच नाहीत....
हे वणवे केवळ कला तत्वज्ञान पुरतेच असते तर चालले असते ... दुर्दैवाने हे वणवे वेगवेगळ्या रंगाचे दहशतवादाचे  आहेत... रंग वेगळे पण आग एकच ...

आय थिंक अमेरिका हरली आहे 
कुठे तरी चुकली आहे ....

आपल्या हिंदीतील ज्येष्ठ नाटककार धर्मवीर भारती
यांच्या  " अंधायुग " या  प्रख्यात नाटकात संवाद येतात एका प्रसंगात..

"" वे है निराश / और अंधे / और निष्क्रीय और अर्धशुष्क / और अंधेरा गहरा होता जाता है / 
क्या कोइ सुनेगा / जो अंधा नही है और विकृत नही , 
और मानव भविष्य को बचायेगा "" ,,,, 

आणि मग सुहेल सफदर यांचे शब्द दाटुन येतात 

"" सब रस्ते गुमराही के 
   और सारे खाब तबाही के 
   सारी सोचे तुफानी ( लंबी )
   और सब रिश्ते तुफानी 
    उजडे बागोके 
     कालड पटवारी 
    और चेहरे शैतानी से "" ....

विश्वसत्तेच्या मर्यादा आणि विकृत न संपणारी लालसा 
आणी त्यासाठी काहीही करु शकणारे जागतिक सत्तेतले सैतान आणि त्यांच्या लेखी आमचे त्यानीच ठरवलेले कम अस्सल निर्बुद्ध  अप्रतिभावान आळशी रानटी असंस्कृत मागास तिसरे जग  ( गरज नसलेले रानटी लोक ) ( Others ) ला ते कधीही चिरडुन टाकु शकतात... 

त्यामुळे ते जग जगणे कधीही वेठीस धरु शकतात....

मती गुंग करणारी ही महामारी याच मुळ काय आणि अंत काय हेच कळेनासे झाले आहे... जग जेव्हा सावरेल यातुन तेव्हा पुन्हा एकदा सगळे जागतिक ताळेबंद बदल्तील... जग बदलेल..

आपण सर्वानी  Alwi Toflar यांच्या futur shock..
Powershift .. Third wave या तिन्ही पुस्तकाकडे दुर्लक्ष केला असेल  
आजच्या जगाच चित्र मांडताना powershift मधे  टॉफलर  म्हणतात ...

या आजच्या येणाऱ्या सत्तांतराणाच्या काळात 
वैचारिक संघर्ष भांडवलशाही लोकशाही आणि साम्यवादी  हुकुमशाहीमधे होणार नसुन एकविसाव्या शतकातील लोकशाही आणि अकराव्या शतकातील दृष्टीहीनता 
यांच्यामधे होणार आहे "" .....

अर्थातच ही दृष्टीहीनता मानवाची उत्तरोत्तर असंस्कृततेकडे जाणारी वाटचाल घडवुन आणली जात आहे.. Dark Age  कडे निघालय जग ? 
सायन्सला आज या काळाचे आव्हान उभे राहिले आहे 
सायन्सलाही आपल्या चौकटी भेदाव्या लागतील..
आज मानवी जग स्वताच्या सर्व स्तरावर उघडे पडले आहे 
आस्तिक नास्तिक आणि इतर सर्वजण Freez झाले आहेत.. 
No way ... No answer ..
Rootless everything....

कुणीही महासत्ता नाही
हे उमजलय सर्वाना ...

कुणीही परमेश्वर नाही 
उपस्थित या क्षणाला ...

एक तत्वज्ञ म्हणालाय...

देवाने माणुस बनवलाय ही त्याची मोठी चूक 
की माणसाने देव बनविलाय ही मोठी चुक ....

Anything may be 

पण माणसे सत्ता आणि काळाला 
ओळखू शकत नसतात 
तेव्हा काळ आपल्याला 
गिळत जातो ............. 

जय भारत 
जय जगत !!

...........

---- Anil Jijabai Tukaram Sarmalkar.

     Saramale.. Sawantwadi
       Sindhudurg.
     

©
............

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.