मुंबई : तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीचे अनुसरून करण्यातून आज आपल्या समोर निर्माण झालेल्या संकटावर मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तथागत गौतम बुद्धांना त्रिवार वंदन केले आहे.
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा आणि समतेचा मार्ग दाखविला.
प्राणिमात्रांसह मानवी जीवनाच्या उत्थानासाठी तथागत बुद्धांनी ध्यान मार्ग आणि तपश्चर्या केली. त्यांच्या संबोधी-ज्ञानाची आज जगाला नितांत गरज आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.