Saturday, May 2, 2020

लॉकडाऊन मुळे काजू बागायतदार चिंताग्रस्त.

प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज.

सावंतवाडी:-सुविधा वागळे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गावागावातील काजू खरेदी बंद असल्याने काजू बागायतदारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.कोरोना विषाणूने संपूर्ण देशासह महाराष्ट्रात थैमान घातले आहे.याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन पाळले जात आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व नोकरीधंदे, व्यापार ठप्प झाले आहेत. याचा फटका काजू व्यावसायिक व काजू बागायतदार यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यंदा लांबलेल्या पावसामुळे तसेच थंडीही हवी न पडल्याने दरवर्षी पेक्षा काजूच्या पिकात घट आली. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे काजू खरेदी बंद असल्याने काजू बागायतदारांचे कंबरडेच मोडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. वर्षाची उलाढाल काजू पिकावर अवलंबून असते. मात्र खरेदी बंद असल्याने काजू बागायतदार चिंतेत सापडले आहेत. तसेच दाराअभावी काजू बागायतदारांनी साठवणूक करून ठेवलेला काजू बी काळे पडण्याची भीती काजू बागायतदारांमधून व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.