सिंधुदुर्गनगरी – केंद्र शासनाने १ मे रोजी जाहीर केलेल्या यादीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये असल्याचे दाखविले आहे. सदर अहवाल हा केंद्र सरकारकडे मागील आठवडी अहवालावर आधारित आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २९ एप्रिल रोजी नव्याने एक कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे. तर जिल्ह्यात रुग्ण सापडण्यापूर्वीच्या माहितीच्या आधारावर केंद्र सरकारने झोन जाहीर केले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये दिसत आहे. पण, ग्रीन झोनसाठीच्या निकषांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्हा हा ऑरेंज झोनमध्ये असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
शेवटचा रुग्ण सापडल्या पासून पुढील २१ दिवस नव्याने एकही कोरोना बाधीत रुग्ण असू नये, असे ग्रीन झोनसाठीचे निकष आहेत. पण सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक कोरोना बाधीत रुग्ण आहे. याविषयी राज्य सरकारमार्फत जिल्हा प्रशासन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचेही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.