Saturday, May 2, 2020

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नागरिकांनी माहिती भरून पाठवावी - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : कृष्णा तुळसकर

लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले  पर्यटक, विद्यार्थी, यात्रेकरु, प्रवासी, स्थलांतरित कामगार आणि इतर अशा नागरिकांनी आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या  https://forms.gle/xhBWCWS5JL8XaAncA या लिंकवर आपली माहिती भरावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज केले.
       जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यामध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या व्यक्तींसाठी यादी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही यादी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. त्यांच्याकडून परवानगी आल्यास अशा लोकांना त्यांच्या-त्यांच्या जिल्ह्यात, राज्यात जाण्यास परवानगी देण्यात येईल. अशा व्यक्ती स्वत:च्या वाहनाने किंवा भाड्याच्या  वाहनाने जावू शकतील.
याच पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक इतर जिल्ह्यात अथवा राज्यात अडकलेले असतील त्यांनी जिल्ह्यात परत येण्याच्या परवानगीसाठी
https://forms.gle/QH64JkBy72h8tbhj7 या लिंकवर माहिती भरावी.  या दोन्ही पद्धतीमध्ये त्या-त्या नागरिकांची त्या-त्या जिल्ह्यात वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्यास त्याला जाण्यास अनुमती देण्यात येईल. कोरोनाशी संबंधित काही लक्षणे असल्यास त्याच्यावर त्याच ठिकाणी उपचार करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
तसेच जिल्हा प्रशासनाच्या 1077 या टोल फ्री क्रमांकावर आणि  ०२३६२२२८८४७, ०२३६२२२८६०८ या क्रमांकावरही संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.