कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हातावर पोट असणाऱ्या या घटकांना या कठिण प्रसंगी दिलासा देण्यासाठी शासनाने मदतीचा हात पुढे केला आहे. तो म्हणजे मनरेगा होय. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेच्या माध्यमातून मजुरांना काम उपलब्ध करुन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील रोजगारास चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही मनरेगा अंतर्गत कामे सुरू करण्यात येणार आहेत.
लॉकडाऊन मुळे औद्योगिक तसेच वाणिज्यक आस्थापना बंद आहेत. त्यामुळे मजुरांसमोर आर्थिक आडचण निर्माण झाली आहे. ही अडचण सोडवण्यासाठीच शासनाने मनरेगाच्या कामांना मान्यता दिली आहे. सदर कामे करत असताना सामाजिक अंतर विषयक निर्देशांचे पालन करणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे वैयक्तीक व सार्वजनिक स्वरुपाची कामे करणे शक्य झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मनरेगा अंतर्गत वैयक्तीक स्वरुपाची फळबाग लागवडीची कामे मोठ्या प्रमाणावर घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
गावनिहाय मंजूर झालेल्या कामांचे नियोजन करुन त्यानुसार तालुका व ग्रामिण स्तरावर प्रत्यक्ष कामे सुरू करताना कृषि संलग्न वैयक्तीक कामांना अधिक महत्व द्यावे, जास्तीत जास्त कामे सुरू करण्यासाठी नियोजन करावे, काम करण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधावा अशा सूचना जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.