Friday, April 17, 2020

इन्सुली गावात धान्य वाटप...

इन्सुली गावात धान्य वाटप...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना आणि अन्नसुरक्षा योजने मार्फत धान्य वाटप....

सावंतवाडी:-असीम वागळे

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासना कडून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून अंतोदय आणि अन्नसुरक्षा योजनेत पात्र लाभार्थ्यांना प्रति माणसी,५ कि. तांदूळ वाटप करण्यात आले. तसेच येत्या मे व जून महिन्यात जे लाभार्थी या दोन्ही योजनेत पात्र नसतील आणि उत्पन्न १लक्ष पर्यंत असणाऱ्यानां ८ रु दराने गहू आणि १२ रु दराने तांदूळ मिळणार आहेत. परंतु काही कुटुंबे या दोन्ही योजनेत पात्र नाहीत व ज्यांची नावे शिधा पत्रिकेवर नाहित पण ज्यांची आर्थिक स्तिथी अत्यंत्य हलाकीची आहे अशा १०० कुटुंबाना (तांदूळ, तूरडाळ, आटा,तेल, साखर )धान्य वाटप करण्यात आले. यासाठी सरपंच पूजा पेडणेकर, माजी प. स. सदस्य नारायण राणे, उप सरपंच सदा राणे , शिवसेना विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रिक्स, उपविभाग प्रमुख उल्हास सावंत, माजी उपसरपंच कृष्णा सावंत, शाखा प्रमुख उल्लास गावडे, सहदेव सावंत, देवेंद्र भिसे, आप्पा आमडोस्कर, सुंदर आरोस्कर, काका चराठकर, नाना पेडणेकर, साईप्रसाद राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
पाहण्यासाठी करा फक्त एक क्लिक ...👇👇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

https://youtu.be/aL0TNVNsQkI

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.