लॉकडाऊनच्या काळात सायबरचे २४१ गुन्हे दाखल.
पुणे ग्रामीण व बुलढाणा येथे नवीन गुन्ह्यांची नोंद.
टिम KONKAN मिरर:-मुंबई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २४१ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य social media वर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये ज्या २४१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यापैकी ८ गुन्हे अदखलपात्र (N.C) आहेत. यामध्ये बीड २७, पुणे ग्रामीण १९, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १०, नाशिक ग्रामीण १०, जालना ९, सातारा८, नाशिक शहर ८, नांदेड ७, परभणी ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलढाणा ५, पुणे शहर ४, गोंदिया ४, ठाणे ग्रामीण ४, सोलापूर शहर ३, रायगड २, हिंगोली २, वाशिम १,धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
या सर्व गुन्ह्यांचे विश्लेषण केले असता असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी ११० तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ८१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. titktok विडिओ शेअर प्रकरणी ४ गुन्हे तर ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४१ गुन्हे दाखल झाले आहेत. आतापर्यंत ४७ आरोपींना अटक केली आहे. ३१ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
पुणे ग्रामीण
पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यांतर्गत, नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये दोन नवीन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. सदर गुन्ह्यातील आरोपींनी आपल्या फेसबुक प्रोफाइलवर सध्या चालू असलेल्या कोरोना महामारीला धार्मिकतेचा रंग देऊन, दोन धर्मात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकेल अशा आशयाच्या पोस्ट्स टाकल्या होत्या.
बुलढाणा शहर
बुलढाणा शहरात एका नव्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ज्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ५ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना बाधित रुग्ण व त्याबद्दलची चुकीची माहिती देणारा व्हिडिओ व्हाट्सॲपद्वारे प्रसारित करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे व नियमांचे उल्लंघन केले.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.