Monday, April 20, 2020

वेंगुर्ला येथील निशाण तलाव परिसरातील परप्रांतीय मजुरांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

वेंगुर्ला येथील निशाण तलाव परिसरातील परप्रांतीय मजुरांना मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..

सामाजिक कार्यकर्ते विलास गावडे यांचे सौजन्य ...

वेंगुर्ला:-ऊमेश जाधव
 कोरोनामुळे लाँक डाऊन व संचारबंदी लागू असल्याने मोलमजुरी करून पोट भरणा~यांवर मोठे संकट उभे ठाकले आहे. वेंगुर्ले शहरातील निशाण तलाव परिसरातील रोजंदारीवर काम करणारे परप्रांतिय मजुर आणि कामगार यांनाही याचा फटका बसला आहे.अशा कामगार व मजूरांसाठी वेंगुर्ले येथील सामाजिक कार्यकर्ते,युवाशक्ती प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष,सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कार्याध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक विलास गावडे यांच्या सौजन्याने आज मोफत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक तथा गटनेते प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत,माजी नगरसेवक मनिष परब,अब्दुल शेख,स्वप्निल गावडे, प्रकाश परब,सौरभ पालयेकर, शुभम गावडे, अल्ताफ शेख,स्वप्निल परब,सखाराम परब आदी उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.