"गारपिट "चोळत आहे,"कोकणच्या जखमेवर मीठ."....
टिम KONKAN मिरर:-रत्नागिरी
कोकणाला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. यामुळे आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालं आहे. रत्नागिरीच्या दापोली, खेड आणि चिपळूण तालुक्यात गारांचा पाऊस पडला आहे. ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं.
तर दुसरीकडे गुहागरला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळाने गुहागरला झोडपलं आहे. गुहागर तालुक्यातील वेळंब गावाला चक्रीवादळाचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे. अनेक घरांचे पत्रे उडाल्यामुळे नुकसान झालं आहे. तर जुनाट वृक्षाखाली ५ जनावरंही अडकली आहेत. चक्रीवादळामुळे गुहागर
चिपळूण तालुक्यातल्या पिंपळीमध्ये वादळी पावसात वीज पडून एकाचा मृत्यू झाला आहे. संतोष गंगागारम झुजम असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही व्यक्ती ४० वर्षांची होती. फार्म हाऊसवर मजूर म्हणून काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.