Wednesday, April 15, 2020

होडावडा येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

होडावडा येथे सामाजिक कार्यकर्ते सुनील विठ्ठल प्रभूशिरोडकर यांनी गावातील गरज कुटुंबांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक हित जोपासले.

संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूमुळे बाधित झाले आहे. त्याचा फटका ग्रामीण भागात जास्त जाणवत आहे. ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सामान्य माणसाला आपल्या दैनंदिन गरजा भागविणे जिकरीचे झाले आहे. याची जाणीव ठेवून होडावडे येथील गरजू कुटुंबाला जीवनावश्यक  वस्तूंचे श्री. प्रभूशिरोडकर यांनी वाटप केले. त्यांनी किराणा साहित्याचे वाटप केले. स्वईच्छेने केलेल्या या कार्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.