Monday, April 13, 2020

फेसबुकवरील "पोस्ट" दोघा युवकांना चांगलीच भोवली.....

फेसबुकवरील "पोस्ट" दोघा युवकांना चांगलीच भोवली.....


बांदा पोलिसांत गुन्हा दाखल ;सावंतवाडी न्यायालयात करणार हजर...

बांदा:-असीम वागळे

फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याबद्दल आज सायंकाळी उशिरा बांदा पोलिसांनी दोघा युवकांना ताब्यात घेतले. या दोघांविरोधात बांदा पोलिसांत ६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत सविस्तर माहिती देण्यास बांदा पोलिसांनी नकार दिला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावरून ब-याचशा अफवा आणि गैरसमजांना ऊत आला आहे. यामुळे सामाजिक वातावरण असंतुलित होत आहे.तरी सदर युवकांनी दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी यातील एक युवक शहर परिसरातील असून,दुसरा नजीकच्याच "नावाजलेल्या" गावातील असल्याचे समजते.तरी दोघांनाही ताब्यात घेतले असून सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.