Thursday, April 30, 2020

मुख्यमंत्री पदासाठी "अंटॉनिया चरणी, आमदारकी साठी मोदी चरणी".......

अतुल भातकळकर यांचा ठाकरेंवर घणाघात......

टिम KONKAN मिरर:'मुंबई
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळानं राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र, त्यावर अद्यापही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

आता याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे अशी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना त्यांच्या नियुक्तीच्या मुद्य्यावर फोन केला. त्यांनी मदत मागितली, ते म्हणाले की जर तसे झाले नाही तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल. पंतप्रधान म्हणाले की ते या प्रकरणात लक्ष घालतील आणि अधिक माहिती घेतील.

मात्र आता यावरूनच भाजपचे नेते अतुल भातकळकर यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. "सत्तेसाठी काय पण… मुख्यमंत्री पदासाठी अंटॉनिया चरणी, आमदारकी साठी मोदी चरणी, चालू दे तुमचं!!!, घालीन लोटांगण, वंदीन चरण…"अस म्हणत भातकळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. आता यावर शिवसेनेकडून कस उत्तर येत याकडे राज्याचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.