Wednesday, April 29, 2020

कामगारांना वेतन अदा करण्याचे निर्देश - टेंबूलकर

कामगारांना वेतन अदा करण्याचे निर्देश : सरकारी कामगार अधिकारी टेंबूलकर

सिंधुदुर्गनगरी : असीम वागळे

कोविड १९ संसर्गाच्या प्रादूर्भावामुळे अनेक अडचणीस सामना करावा लागत आहे. केंद्र व राज्य शासन प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत वेळोवेळी सविस्तर सुचना प्राप्त होत आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांनी उद्योग, उर्जा व कामगार विभागाच्या शासन निर्णयाद्वारे सर्व खाजगी, आस्थापना, कारखाने, कंपन्या, दुकाने इ. आस्थापनाचे सर्व कामगार (कंत्राटी, बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यात आलेले कर्मचारी व कामगार, तात्पुरत्या कालावधीसाठी कर्मचारी व कामगार, रोजंदारीवरील कामगार) ज्यांना कोविड-१९ च्या प्रादुर्भामुळे महाराष्ट्र शासनाच्या आदेशामुळ घरी/स्थानबध्द रहावे लागत आहे. अशा सर्व कामगार/कर्मचारी हे कर्तव्यावर असल्याचे समजण्यात यावे व त्यांना संपूर्ण वेतन व भत्ते अदा करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आलेले आहेत.
            महाराष्ट्रातील सर्व निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्यिक, व्यापारी व दुकाने आस्थापनांना सदरचे आदेश लागू आहेत. यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी टेंबूलकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.