सावंतवाडीच्या स्टेपिंग स्टोन प्रशालेची विद्यार्थिनी अस्मी अमेय तेडोंलकर चे राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परिक्षेत उज्वल यश...
जिल्ह्यात तिसरी तर तालुक्यात प्रथम येत पटकविले "सुवर्णपदक"
सावंतवाडी:-
जानेवारी २०२० मध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय ब्रेन डेव्हलपमेंट स्पर्धा परीक्षेत (इंग्लिश मीडियम इयत्ता पहिली) मध्ये शिकणारी सबनिसवाडा सावंतवाडी येथील स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल ची विद्यार्थिनी कु.अस्मी अमेय प्रभू तेंडोलकर हिने सावंतवाडी तालुक्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तिसरा क्रमांक व महाराष्ट्र राज्यात छत्तिसावा क्रमांक पटकावून सुवर्णपदकाची विजेती ठरली आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. रेडी येथील गोगटे फोमेंतो कंपनीचे माजी जनरल मॅनेजर यशवंत प्रभू तेंडोलकर व रेडी हायस्कुलच्या माजी शिक्षिका सौ.वनिता यशवंत प्रभू तेंडोलकर यांची नात तसेच युवा उद्योजक अमेय यशवंत प्रभू तेंडोलकर व सावंतवाडी येथील वाॅव किड्स रायन स्कूलच्या शिक्षिका सौ.जागृती प्रभू तेंडोलकर यांची त्या कन्या आहेत.
कुमारी अस्मी हिच्या या उत्तुंग यशात तिच्या आजी-आजोबा तसेच तिची आई वडील व माडखोल शाळेचे शिक्षक दत्ताराम सावंत यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. अस्मी च्या यशाने तिचे सावंतवाडीतच नव्हे तर सर्वत्र कौतूक होत आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.