Wednesday, April 29, 2020

अभिनेता ऋषी कपूर यांचं निधन, बॉलिवूडवर शोककळा...

मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात वयाच्या 67 व्या वर्षी ऋषी कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला..

टिम KONKAN मिरर:-मुंबई

          बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं आज निधन झालं. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. ऋषी कपूर यांची रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू सुरू होते.ऋषी कपूर  यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी झाला.हा एक भारतीय सिने अभिनेता व दिग्दर्शक आहे. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणार-या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती.९० च्या व २००० च्या दशकात नायकाच्या भूमिका करणा-या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला. "कुछ तो है" या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवुन ठेवतो तर अग्निपथ (2012) मध्ये रौफ लाला हा भीतीदायक वाटतो. तर औरंगजेब सिनेमातीलभूमिका निर्दयी वाटते. अशा या दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.