Monday, April 20, 2020

लवकरच सिंधुदुर्ग येणार ग्रीन झोनमध्ये.....

 लवकरच सिंधुदुर्ग येणार ग्रीन झोनमध्ये.....

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी.....

कोरोना पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरास भेट

सावंतवाडी:- संजोग जाधव
  सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक कोरोना आजाराचा रुग्ण आढळून आला होता परतू तो बरा होवून अजुन २८ दिवस न झाल्यानेच सिंधुदुर्ग जिल्हा हा ऑरेंज झोन मध्ये आहे. त्या रुग्णाला २८ दिवस पूर्ण होताच सिंधुदुर्ग जिल्ह्याला ग्रीन झोन म्हणून जाहीर करता येवू शकते अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज मांडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी शहरास भेट देण्यासाठी आल्या असताना पत्रकारांशी त्यानी संवाद साधला होता. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, मुख्याधिकारी संतोष जिरगे, तहसीलदार राजाराम म्हात्रे, नगराध्यक्ष संजू परब आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.