Saturday, April 4, 2020

सावंतवाडी नगरपरिषदेच्यावतीने कोलगाव परिसरात जंतूनाशक फवारणी करुन द्यावी - मायकल डिसोजा

जि. प. सदस्य मायकल डिसोजांनी नगराध्यक्ष संजू परब यांच्याकडे केली मागणी

सावंतवाडी : प्रतिनिधी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोलगाव, आंबेगाव, कुणकेरी, कारीवडे या ग्रामपंचायत भागात जंतूनाशक फवारणी करणे आवश्यक आहे. सर्व ग्रामपंचायती या सावंतवाडी शहरालगत आहेत. त्यामुळे या गावातून बहुतांश नागरिकांची शहरात नेहमीच वर्दळ सुरू असते. ज्याप्रमाणे सावंतवाडी शहरात जंतूनाशक फवारणी केली, त्याच धर्तीवर कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघात फवारणी करावी. सदर जंतूनाशक फवारणी करण्यासाठी कोलगांव जि.प.मतदारसंघातील ग्रामपंचायतीकडे पुरेसे फवारणी साहीत्य नाही. सावंतवाडी नगरपरिषदेने आरोग्य विभागाकडून ही फवारणी करुन द्यावी, अशी मागणी कोलगावचे जि. प. सदस्य मायकल डिसोझा यांनी नगराध्यक्ष संजू परब यांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी पं.स.सदस्य मेघश्याम काजरेकर, सरपंच शिवदत्त घोगळे, संदीप(बाळू) गवस आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.