*_🖍️गावाकडील संकटातील कुटूंबाचा घेतलाय त्याने ध्यास...🖍️_*
*_✍️मालवण :-प्रसाद नाईक_*
*_✍️मालवण :-प्रसाद नाईक_*
_मालवण तालुक्यातील वायंगणी, कालावल येथील युवक मयूर वायंगणकर हा आपली पत्नी प्राची वायंगणकर हिच्यासमवेत कामानिमित्त मुंबई जोगेश्वरी येथे राहत होता. परंतु अगदी काहीच महिन्यापूर्वी पत्नी प्राची गर्भवती असल्याने तसेच मयूर यांच्या वडिलांना लकवा हा आजार जडल्याने तिला मयूरने आपल्या मूळ गावी वायंगणी येथे सोडले होते. घरात प्राची व तिचे सासरे यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणी नसल्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी प्राची यांच्याकडे होती. परंतु सद्य परिस्थितीत मयूर मुंबईला अडकल्यामुळे प्राची यांना सासर्यांच्या तसेच स्वतःच्या वैद्यकीय तपासण्या करणेही मुश्किल झालेले आहे. तरी सदर कुटुंबाच्या ताटातुटी मुळे तीन जीवांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. त्यामुळे त्या बाबतीत प्रशासनाने लक्ष घालून योग्य ती मदत पुरवावी तसेच मयूर याला आपल्या मूळ गावी जाण्यास कायदेशीर तसेच वैद्यकीय सुरक्षीततेखाली सहकार्य करावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद मुंबई अध्यक्ष कथा कोकण संपर्कप्रमुख निलेश कुडतरकर यांनी केले आहे._
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.