Sunday, April 26, 2020

संकट हे कोरोनाचे, देह हा झिजला; परी निष्फळ लढा, लढता-लढता अंतरला.....


संकट हे कोरोनाचे, देह हा झिजला; परी निष्फळ लढा, लढता-लढता अंतरला.....

कोकणवासीय पोलिसाचा मुंबईत कोरोनाने मृत्यू....


टिम KONKAN मिरर:-मुंबई
मुंबईचे पोलिस हवालदार क्रमांक २७३८३ श्री. चंद्रकांत गणपत पेंदुरकर वय ५७ वर्षे रा ठी ५१८/२/१० प्रेमनगर कॉलनी वरली नाका मुंबई मूळ गाव -मु.पो.फणसगाव ता.देवगड जिल्हा-सिंधुदुर्ग हे दिनांक०१/१२/८८ रोजी पोलिस दलात भरती झाले होते. अतिशय प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचारी अशी त्यांची जनमानसात ओळख होती.सदरचे हवालदार वाकोला पोलीस ठाणे येथे कार्यरत होते. मात्र मागील बरेच दिवस ते कोरोनाने आजारी होते. आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुलगे व ०१ मुलगी व पत्नी सूजाता पेंदुरकर असे कुटुंबीय आहे तरी पेंदुरकर यांच्या निधनाने संपूर्ण पोलिस दलात त्याचप्रमाणे अनेक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.