Wednesday, April 29, 2020

वैभववाडी तालुक्यात जोरदार वादळ पाऊस....

शेतकरी तसेच बागायतदार हवालदिल....


वैभववाडी:-प्रतिनिधी



वैभववाडी तालुक्यात बुधवारी मध्यसंध्याकाळी जोरदार वादळी पाऊस पडला.अचानक झालेल्या वादळामुळे आंबा व काजूचे मोठे नुकसान झाले आहे.गेले अनेक दिवस ढगाळ वातावरण होते.त्यामुळे प्रचंड उष्णता वाढली होती. बुधवारी ४:३० वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी पाऊस पडला.या वादळाने काजूचे बी ,रायवळ आंब्याच्या कैऱ्या ,हापूस आंबे जमिनीवर पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

सह्याद्री पट्ट्यातील कुर्ली, करूळ, नावळे ,सडूरे ,शिराळे ,सांगुळवाडी,भुईबावडा, कोकिसरे,नाधवडे ,लोरे,आचिरने आदी भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला.अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या काही प्रमाणात असलेला आंबा काजू बागांचे नुकसान झाले आहे .कोरोना व्हायरसमुळे मुळातच काजू बिला दर कमी मिळत असल्याने हवालदिल झालेल्या शेतकरी अजून अडचणीत सापडला आहे. बुधवारी पडलेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला.अवकाळी पावसाने तालुक्यातील आंबा बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.