Thursday, April 23, 2020

सोलापूरचे नवीन पालकमंत्री...दत्तात्रय भरणे.

सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी दत्तात्रय भरणे
एकाच महिन्यात दुसरी नियुक्ती करण्याची पहिलीच वेळ

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ठाणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल झाले असून खबरदारी म्हणून

तपासणी करणार असल्याच्या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुजोरा देण्यात आला आहे याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने सोलापूर जिल्ह्याचे पालकत्व इंदापूरचे आमदार सतार राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविले आहे तशा प्रकारचे नियुक्तीपत्र सुद्धा त्यांना सुपूर्त करण्यात आलेले आहे पण महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत पालकमंत्री बदलण्याची तब्बल ही तिसरी वेळ आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.