अभिनव उपक्रमाचे जिल्हाभरातून कौतुक....
फोंडाघाट:-प्रतिनिधी
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचलित, कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट यांनी COVID-19 जनजागृती मोहिमेंतर्गत ऑनलाइन प्रश्नमंजुषा चाचणी आयोजित केली आहे. यात सहभागी असंख्य नागरिक, विद्यार्थ्यांना संरक्षणा बरोबरच कोरोणा बाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लाँकडाऊन घोषित केले असून नागरिक त्याचे पालन करीत आहेत. महाविद्यालय या काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवित आहे. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अंतर्गत गुणवत्ता नियंत्रण कक्ष, यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोणा विषयी जनजागृती करण्यासाठी ऑनलाइन चाचणी आयोजित केली आहे.
चाचणीचा उद्देश कोरोनाबाबत लोकांकडे किती प्रमाणात माहिती आहे हे जाणून घेणे हा आहे. यात कोरोणा विषाणू कुठून आला? कोरोना होण्याची कारणे, लक्षणे यावरील उपाय याबाबत जनजागृती व संरक्षण विषयक प्रश्नांचा समावेश असून ही ऑनलाईन चाचणी उत्तीर्ण होणाऱ्यांना त्यांच्या ई-मेलवरती प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.डॉ. बालाजी सुरवसे (९४२१२३७३६५) व अंतर्गत गुणवत्ता निर्धारण कक्षाचे समन्वयक प्रा.डॉ. राजाराम पाटील (९४२११४८०७८) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच या चाचणीत जास्तीत जास्त विद्यार्थीनी व नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सतीश कामत यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.