Sunday, April 19, 2020

किटकनाशकाच्या प्राशनाने महिला अत्यवस्थ...

किटकनाशकाच्या प्राशनाने महिला अत्यवस्थ...

निगुडे गावठण वाडी येथील घटना!!!
बांदा:-असीम वागळे

निगुडे गावठण वाडी येथील (३३ )वर्षीय महिलेने काजू झाडावर फवारणी करण्यात येणारे किटकनाशक प्राशन केल्याने अत्यवस्थ झाली, तरी तिला त्वरित सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु परिस्थिती गंभीर असल्यामुळे सदर महिलेला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. तरी सदर प्रकारा मागचे कारण अद्यापही "गुलदस्त्यात" असून सावंतवाडी पोलीस स्थानकात याची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.