Friday, March 6, 2020

नारी शक्ती; तुझे सलाम

'कोकणच्या कन्येने', 'कोकण रेल्वेच्या' ताफ्यातील हाकली "कोंकण कन्या"....

मुंबई : विशेष प्रतिनिधी

आज समाजात स्त्री सर्वच गोष्टीत पुरुषाच्या खांद्याला खांदा भिडवून ताठ मानेने जगत आहे.अगदी बस सेवेपासून ते विमानसेवेपर्यंत सर्वोच्च क्षेत्रात आपल्याला नारी शक्तीचा कुठेच अभाव दिसून येत नाही. पण उणीव होती मात्र ती, कोकण रेल्वेच्या महिलाा चालक पदाची...
    पण आता ती उणीव भरून काढली आहे ती रायगड जिल्ह्यातील, माणगाव तालुक्यामधील सालवे गावच्या "कोकण कन्येने" म्हणजेच प्रिया बाबुराव तेटगुरे, या कन्येने अगदी लहानपणापासूनच रेल्वेचालक होण्याचे स्वप्न उराशी घेऊन प्रयत्नांची पराकाष्टा करणारी ही मुलगी अखेर आज कोकण रेल्वेची पहिली महिला चालक बनली आणि या पहिल्याच मुक्त मुराद सफरीत तिला संधी मिळाली ती "कोकण कन्या" चालविण्याची तरी संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारत देशात अगदी कौतुकास पात्र ठरली आहे ती आपली पहिली वहिली महिला रेल्वे चालक....

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.