बेदरकारपणे गाडीने दुचाकीस्वारस उडविले; दुचाकीस्वार जागीच ठार
कुडाळ: अमोल जाधव
प्रतिनिधी: आज सकाळी ६.३० च्या सुमारास दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकी क्र. MH07AL9730 घेऊन जात असताना समोरून येणारे चारचाकी वाहन MH03BW6710 याने बेदरकारपणे धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या चारचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या दारूचे 'खोके' असल्याने सदर चारचाकी वाहन चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला.
सदर अपघात हा पिंगुळी कौल फॅक्टरी जवळ करमळगाळू येथे घडला. तरी अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत एकच गर्दी केली. पण तोपर्यंत चारचाकी वाहन चालकाने चारचाकीचा टायर पंक्चर असतानासुद्धा घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर सुमारे दीडशे मीटर अंतरावर चारचाकी टाकून पोबारा केला. तरी जखमी कडून मिळालेल्या माहितीनुसार मयत व्यक्ती ही कोचरा (ता. मालवण) गावातील असल्याचे समजते. जखमीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सदर अपघाताची अद्यापपर्यंत पोलिसात नोंद नाही.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.