Sunday, August 11, 2024

अनिल सरमळकर लिखित Enemy America पुस्तक ऐन अमेरिकेच्या निवडणुक काळात होतेय अमेरिकेतच प्रकाशित.

मुंबई : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक नाटककार कोकणचे सुपुत्र अनिल कांबळे सरमळकर यांचे Enemy America हे अमेरिकन साम्राज्यवादाची परखड टिका करणारे स्फोटक पुस्तक अमेरिकेतील प्रकाशनाच्या वतीने ऐन निवडणूक काळात अमेरिकेतच प्रकाशित होत आहे.

अनिल सरमळकर यांनी कविता नाटक कादंबरी चित्रपट लेखनाबरोबरच दर्जेदार वैचारीक व समीक्षा लेखनही केले आहे. अलीकडेच त्यांचे Death of Arts हे  एकूणच वैश्विक कला आणि त्याचा होणारा संभाव्य अंत याबद्दलचे खळबळजनक भाष्य करणारे पुस्तक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले असुन त्याची अनेक मोठ्या युरोपीय विद्यापीठांतुन व नामवंत समीक्षक विचारवंत इत्यादींकडुन दखल घेतली जात आहे.

दरम्यान Enemy America हे पुस्तक स्फोटक विचारांनी भरलेले असुन लेखक अनिल सरमळकर यांनी गेल्या दोन दशकात जी  अमेरिकन बकासुरी भांडवलशाहीची अमेरिकन रणनीतीची जी समीक्षा केली आहे ते संपूर्ण लेखन या पुस्तकात अंतर्भूत करण्यात आले आहे.

अमेरिकन निरंकुश भांडवलशाही साम्राज्यवाद युध्दपिपासु रणनीती इत्यादीचे  परखड टिकात्मक विवेचन अनिल सरमळकर यांनी या पुस्तकात करतांना  अमेरिकेतील सकारात्मक बाजूंच्या सामर्थ्याचे कौतुकही केले आहे. 

तथापि ऐन अमेरिकेतील निवडणूकांच्या काळात हे पुस्तक खुद्द अमेरिकेतच प्रकाशीत होत आहे या धाडसाबद्द्ल लेखक अनिल कांबळे सरमळकर व प्रकाशक यांचे कौतुक होत आहे, असुन या पुस्तकाबद्दल कोणत्या प्रतिक्रिया अमेरिकेत उमटतील हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.





No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.