Wednesday, August 5, 2020

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरु - एस. एच. पाटील

सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यातील विविध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये विविध कौशल्याच्या प्रशिक्षणासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. सदरची ऑनलाईन (Online) प्रवेश प्रक्रिया 14 ऑगस्ट 2020 पर्यंत https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर सुरु राहणार आहे. अर्ज निश्चिती शुल्क राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तर खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये ऑनलाईन (Online) भरावे लागणार आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन,जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.एच.पाटील यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पुढीलप्रमाणे व्यवसाय प्रवेश सत्र 2020 साठी उपलब्ध आहेत. 1) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी येथे कारपेंटर, कम्प्युटर ऑपरेटर ॲंड प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, फिटर, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन,टेक्नोलॉजी सिस्टीम मेंटेनन्स, मॅकेनिक मोटर व्हेईकल, सिवींग टेक्नोलॉजी, टर्नर, वायरमन संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02363-272136. 2) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे ड्रेस मेकींग, फुड प्रोडक्शन(जनरल), फ्रंट ऑफिस असिस्टंट, मेकॅनिक डिझेल, एस.सी.व्ही.टी.-फुड अँड बेव्हरेजीस सर्व्हीसेस असिस्टंट, वेल्डर संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02362 -228090. 3) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दोडामार्ग येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, कंम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02363-256980. 4) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला येथे ड्रेस मेकींग, वेल्डर, वायरमॅन संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02366-262167. 5) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण येथे ड्रेस मेकींग, मॅकेनिक डिझेल, रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन, वेल्डर संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02365-251516. 6) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, देवगड येथे कंम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्रेस मेकींग, इलेक्ट्रीशियन, फिटर, मॅकेनिक डिझेल, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर टेक्निशियन, वेल्डर संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02364 -262094. 7) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, फोंडाघाट येथे कंम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स, फँशन डिझाईन अँड टेक्नोलॉजी, इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, प्लंबर, शीट मेटल वर्कर संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02367-245566. 8) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वैभववाडी येथे इलेक्ट्रीशियन, फिटर, मेकॅनिक डिझेल, सिवींग टेक्नोलॉजी, वेल्डर संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02367-237246. तरी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर भेट देवून अर्ज भरुन आपला प्रवेश निश्चित करावा. या संदर्भात काही अडचणी असल्यास 02362 -228565 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी एस.एच.पाटील यांनी केले आहे

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.