Sunday, June 7, 2020

जिल्ह्यात आणखी ३ कोरोना बाधीत व्यक्ती; एकूण रुग्णसंख्या १२१ वर -जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा सामान्य रुग्णालयास आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये ३ पॉझिटिव्ह रुग्ण आलेले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १ रुग्ण दोडामार्ग,१ रुग्ण कणकवली तर १ रुग्ण देवगड तालुक्यातील आहे. सध्या जिल्ह्यात १२१ रुग्ण कोरोना बाधित रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिली.
          जिल्ह्यात सध्या कणकवली तालुक्यात मौजे हळवल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवल नं. १, मौजे कलमठ येथील जि.प. प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी, मौजे तळेरे, मौजे नाटळ, मौजे कुरंगवणे, मौजे नवीन कुर्ली वसाहत, मौजे जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, मौजे शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव,डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, मौजे हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी,आईनतळवाडी, व्हावटवाडी, मौजे बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कुल व आवार, मौजेकासार्डे येथील धुमाळवाडी, मौजे हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, मौजे बावशी येथील शेळीचीवाडी, मौजे पियाळी येथील गावठण आदी कंटेन्मेंट झोन आहेत.
          वैभववाडी तालुक्यात मौजे भूईबावडा गावातील बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, मौजे वेंगसर गावातील बंदरकरवाडी, मौजे तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, मौजे कोळपे वमेहबुबनगर, ब्राह्मणवाडी, उंबर्डे आणि मौजे कोकिसरे गावातील पालकरवाडी कंटेन्मेंट झोन आहेत.
          सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावठणवाडी, मौजे माडखोल येथील बामणादेवीवाडी, मौजे निरवडे माळकरवाडी, मौजे बांदा गाव गवळीटेंबवाडी, मौजे असणिये येथील भट्टवाडी, धनगरवाडी, वायंणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी,घोणसाटवाडी, मधलीवाडी, मौजे सातोसे - दुर्गवाडी या ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत.
          कुडाळ तालुक्यातील कंटेन्मेंट झोन पणदूर – मयेकरवाडी, आंब्रड गावची वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, मौजे पडवे गावची पडवे पहिलीवाडी,मौजे गावराई गावची टेंबवाडी, मौजे रानबांबूळी गावची पालकरवाडी, मौजे हिर्लोक गावखालची परबवाडी, मौजे साळगाव लुभाटवाडी हे कंटेन्मेंट झोन आहेत.
          मालवण तालुक्यातील मौजे चिंदर येथील देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठणवाडी, बागवाडी, गोसावी मठ, हिवाळे, सुकळवाड येथील राऊळवाडी व ठाकरवाडी असे आहेत.
          वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड हे कंटेन्मेंट झोन आहेत. देवगड तालुक्यातील मौजे शिरगाव मधील धोपटेवाडी, मौजे नाद मधील भोळेवाडी, मौजे नाडन येथील मिराशीवाडी कंटेन्मेंट झोन आहेत.
    
          जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण २ हजार ५६४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी २ हजार ४५३ तपासणी अहवाल प्राप्त झालेआहेत. त्यातील १२१ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत २ हजार ३३२ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून १११ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्यरुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १२१ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ७६ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, ४५ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखलआहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ५ हजार ८३३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १२१ कोरोना बाधीत रुग्णांपैकी १७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मे पासून आज अखेर एकूण ७७ हजार २७८ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.