Sunday, May 3, 2020

जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

सिंधुदुर्गनगरी : संजोग जाधव
जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १० लाख रुपयांची मदत दिली आहे.
या मदतीचे धनादेश आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सावंतवाडीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी यांनी एकवीस हजार, पंचम खेमराज महाविद्यालय – दोन लाख ११ हजार ९७७, एस.के. पाटील महाविद्यालय – ६२ हजार १५४, महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था – १ लाख २ हजार ५३६, आर्ट्स व कॉमर्स महाविद्यालय फोंडा – ३८ हजार ८४५, एस. एच. केळकर महाविद्यालय – १ लाख ८१ हजार ७३०, कणकवली महाविद्यालय – १ लाख ५ हजार १६६, बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय – १ लाख ३३ हजार ४६५, संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ – १ लाख ३२ हजार ३५९, लक्ष्मीबाई सी. हळबे महाविद्यालय – २४ हजार ७७५, रावसाहेब गोगटे महाविद्यालय – ५९ हजार ५७० रुपये या प्रमाणे एकूण १० लाख ७३ हजार ५७७ रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.