Saturday, May 9, 2020

रिलायन्स फाउंडेशनमार्फत पशुपालकांना मार्गदर्शन


ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन

सिंधुदुर्ग : कृष्णा तुळसकर

रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा यांच्यामार्फत ध्वनी चर्चासत्राच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी  पशुपालकांना मार्गदर्शन  करण्यात  आले. कोव्हीड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शेतकरी व पशुपालकांच्या समस्या व असलेले गैरसमज दूर करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
          कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व कुडाळ  तालुक्यातील २० पशुपालकांनी घरबसल्या मोबाईलच्या साहाय्याने डायल आऊट कॉन्फरन्सच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून  आपले पशुधनाविषयी शंकांचे तज्ञ् मार्दर्शकाकडून करून निराकरण घेतले.  या कार्यक्रमासाठी तज्ञ् मार्गदर्शक म्हणून धुळे कृषि विज्ञान केंद्राचे पशुधन विषयतज्ञ् म्हणून डॉ.धनराज चौधरी यांनी पशुपालकांना मार्गदर्शन  केले.  या ध्वनी चर्चासत्रांध्ये पशुधनाला कोरोनाचा संसर्ग होतो का? जनावराची खाद्य नियोजन, लसीकरण, दुग्धव्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन डॉ. धनराज चौधरी यांनी केले.
             तसेच कोव्हीड-१९च्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजना, पुरवठा याची माहिती रिलायन्स फाउंडेशनचे कृषीतज्ञ् सचिन मताळे यांनी दिली. या कार्यक्रमाचे नियोजन रिलायन्स फाऊंडेशनचे कार्यक्रम सहाय्यक गणपत गावडे यांनी केले. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू रिलायन्स फाउंडेशनचे व्यवस्थापाक शुभम  लाखकर यांनी  केले. कार्यक्रमाचे निवेदन व मार्गदर्शन  रिलायन्स  फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा  व्यवस्थापक राजेश कांबळे  यांनी केले. कार्यक्रमाला पशुपालकांचा व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.