जिल्ह्यातील आणखी दोन रुग्णांचे अहवाल फेरतपासणीमध्ये निगेटीव्ह - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी : अभय जाधव
जिल्ह्यात सापडेलल्या तिसऱ्या व चौथ्या कोरोना बाधीत रुग्णांचे फेरतपासणी अहवाल आज निगेटीव्ह आले आहेत. अहवाल निगेटीव्ह आले तरी या दोन्ही रुग्णांना अजून जिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले नाही. त्यांना आणखी काही दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.
देवगड तालुक्यातील वाडा गावामध्ये कन्टेंन्मेंट झोन तयार करून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. तीन किलोमीटरच्या या कन्टेन्मेंट झोनमध्ये वाडा, नाडन आणि पुरल या गावांचा समावेश आहे. या कन्टेन्मेंट झोनमध्ये एकूण ६९५ घरामधील ७३६ कुटुंबातील ३ हजार ५९ व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये वाडा गावातील ३५२ घरांमधील ३६१ कुटुंबातील १ हजार ५१९ नागरिक, नाडन गावातील १७४ घरातील २३१ कुटुंबातील ९७४ नागरिक व पुरल गावातील १६९ घरांमधील १४४ कुटुंबातील ५६६ नागरिकांचा समावेश आहे.
वाडा (ता. देवगड) येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण १ हजार ७४ व्यक्ती अलगीकरणात असून ७४५ व्यक्ती गृह अलगीकरणात तर ३२९ व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण ८६८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी ८१७ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ५ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत ८५२ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून ५१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या ७९ रुग्ण दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ६ हजार ३३८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या ५ कोरोना बाधीत रुग्णांपैकी तीन रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून इतर दोन रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक १२ मे रोजी ९७५ व्यक्ती दाखल झाल्या असून आज अखेर जिल्ह्यात एकूण ४ हजार १५१ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी आतापर्यंत १ हजार १३७ पासेस जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.