दोनच दिवसांपूर्वी त्यांची आई सईदा बेगम यांचं झाल होतं निधन....
टिम KONKAN मिरर:-मुंबई
बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं.
दोन दिवसांपूर्वी त्यांची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान यांना आईला शेवटचं पाहता आलं नाही. आईचं अंत्यदर्शनही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला पाहता न आल्याचं दुःख त्यांच्या मनात होतं.
इरफानला देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी श्रद्धांजली अर्पण करत आहेत. खा.उदयनराजे भोसले यांनी देखील फेसबुकवर पोस्ट करत इरफानला आदरांजली वाहिली आहे. खा. भोसले आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात…
आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारेव स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारे, आमच्या आवडत्या अभिनेत्यांपैकी एक असलेले अभिनेता इरफान खान यांचे आज निधन झाले. colon infection च्या आजारामुळे त्यांनी आज मुंबई मधे वयाच्या ५४ व्या वर्षी यांनी जगाचा निरोप घेतला. नाटक, मालिका, सिनेमे करून उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय सिनेमात झेप घेऊन स्वतःची व देशाची जागतिक पातळीवर छाप उमटवली.
२०११ साली मिळालेला पद्मश्री, फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायक पुरस्कार – २००३ (हासिल चित्रपटातील भूमिकेसाठी) फिल्मफेअर सर्वोत्तम साहाय्यक अभिनेता पुरस्कार – २००७ (लाईफ इन मेट्रो चित्रपटासाठी), तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेता- २०१२ पानसिंग तोमर हे सर्वोत्तम पुरस्कार सर्वोत्तम अभिनेता या शब्दाला सन्मान देतात.
कर्करोग झाला तेव्हा संपूर्ण देशाला तो मोठा धक्का होता हा जिगरबाज अभिनेता कॅन्सर ला हरवेल अशी खात्री होती पण आज काळाने घात केलाच. एक सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून सिने चाहत्यांच्या व देशाच्या कायम काळजात राहशील.भावपूर्ण श्रद्धांजली..

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.