Wednesday, April 29, 2020

*_⛴🛳रेडीत खनिज वाहतूक करणारे जहाज दाखल.....🛳⛴_*

*_⛴🛳रेडीत खनिज वाहतूक करणारे जहाज दाखल.....🛳⛴_*

*_🇻🇳जहाजावर कॅप्टनसह २१ परदेशी कामगार :आरोग्य विभागाकडून तपासणी..🇻🇳_*

*_🖋तहसीलदार प्रविण लोकरे यांची माहिती.🖋_*


*_✍वेंगुर्ला:-कृष्णा तुळसकर_*
_कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून परदेशातुनही सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंदी घातलेली असतानाच रेडी पोर्ट येथे इंडोनेशिया येथून मुंबई मार्गे एक जहाज मायनिंग वाहतूक करिता दाखल झाले आहे. दरम्यान या जहाजाला रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जोरदार विरोध करण्यात आला असून या जहाजाला परत पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या जहाजावर कॅप्टन सह २१ परदेशी कामगार असून त्यांची तेथे जाऊन जिल्हा आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. त्यांना कोणताही कोरोना संदर्भात त्रास नसल्याने आज पासुन बोटीवरील काम सुरू करण्यात आले आहे. मात्र या बोटीवर कामासाठी गेलेल्या स्थानिक १३ कामगारांची बोटीवरील काम संपल्यावर आरोग्य तपासणी केल्या नंतरच त्यांना घरी पाठवायचे की कॉरन्टाईन करायचे याचा निर्णय होईल अशी माहिती तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी दिली._



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.