Friday, April 24, 2020

कोणी कोकण दाखवता का ? कोकण ? एक कोकणी "कोकणसम्राट".....

कोणी कोकण दाखवता का ? कोकण ? एक कोकणी "कोकणसम्राट".....

कोकणवासीय अडकलाय मुंबईत....


खासदारांचे मात्र चालू आहेत राजरोस दौरे

निलेश कुडतरकर, कोंकण मिरर ब्युरो चीफ असीम वागळे तसेच पोलिस टुडेचे न्यूज ब्युरो जनार्दन सावंत यांनी उठविला आवाज...

मुंबई:-प्रतिनिधी 
सहा गाड्या घेऊन कोकणात जाणाऱ्या खासदारांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय कशासाठी?खासदार राऊत यांच्याबरोबर ६ गाड्या कशा कोकणात सोडल्या? 

 त्या ६ गाड्यातून गेलेल्या लोकांची तपासणी किंवा quarantine न करता गावात कसे सोडले? उद्या यांच्यामुळे कोकणात कोरोना बाधा झाली तर जबाबदार कोण? मुख्यमंत्री महोदय तुम्ही खासदाराला कोकणात सोडता, तुम्ही परप्रांतीय मजुरांसाठी ट्रेन सोडायची मागणी करता, मग तुमच्या हातात असलेल्या एसटी बसेस सोडून योग्य तपासणी करून कोकणी माणसाला का गावी जाऊ देत नाहीत ?
















कशासाठी मग हा भेदभाव?आम्ही करीत आहोत आपल्याकडून मदतीसाठी याचना...कदाचीत खासदारांची योग्य ती तपासणी करून आपण परवानगी दिली असेल,यात संदेह नाही.पण जर खासदार कोकणात येऊ शकतात,तर माझा कोकणी बांधव का नाही?अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष निलेश कुडतरकर, कोंकण मिरर न्यूज चॅनल ब्युरो चीफ असीम वागळे तसेच पोलिस टुडे चे ब्युरो चीफ  जनार्दन सावंत यांनी थेट महाराष्ट्र सरकारला आवाहन केले आहे






No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.