Thursday, April 9, 2020

गोव्यातील दारूच्या चोरट्या वाहतुकीस येत आहे ऊत

गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतुक राजरोसपणे

पत्रादेवी नाक्यावर आणखी एक धडक कारवाई

बांदा : असीम वागळे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. सर्व व्यवहार ठप्प असल्याचा फायदा उठवत गोवा महाराष्ट्र सीमेवर पत्रादेवी नाका येथे दारू वाहतूक करणारा आयशर ट्रक ताब्यात घेतला आहे. या कारवाईत ट्रक व दारू असा पंधरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज संध्याकाळच्या सुमारास करण्यात आली आहे. यामध्ये सागर पाटील (वय २५), सुरेंद्र तुलसानी (वय ३२) दोघे रा. कोल्हापूर यांना अटक करण्यात आली आहे. याची गाडी जप्त करण्यात आली असून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर, हवालदार सुमित चव्हाण, धनंजय गोले आणि कमतनुरे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.