Tuesday, April 28, 2020

रेडी बंदर


*_😷कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेडी बंदर हाय अलर्ट..😷_*

*_🛥️मुंबईतून येणार मालवाहू जहाज; सर्वांची तपासणी करून कोरेनटाईन करणे गरजेचे...🛥️_*

*-🙆‍♂️"सिर सलामत, तो पगडी पचास" खनिज व्यवसाय चालू होतात तर जनता लॉकडाऊनमध्ये  का???....सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर.🙆‍♂️_*

*_✍️वेंगुर्ला:- कृष्णा तुळसकर_*
Covid-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण भारत देशासह सिंधुदुर्ग जिल्हा लॉकडाऊन अवस्थेत आहे. यातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी बंदर म्हणून ओळखले जाणारे रेडी बंदर हे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हायलाईट करून सदर बंदरावरील संपूर्ण वाहतूक तसेच व्यापार तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेले आहेत. मात्र सदर बंदरावरून वाहतूक होत असलेले खनिज घेऊन जाण्यासाठी मुंबईहून मालवाहू जहाज येणार आहे. तरी संबंधित बंदर प्रशासन,शासनाने घालून दिलेले नियम पायदळी तुडवून सदर जहाज रेडी बंदरामध्ये लोडींग करण्यास आपल्या कॉन्ट्रॅक्टरना दबाव घालीत आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आपल्या सुदैवाने आपला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग जागृत पत्रकार, तसेच स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या देखरेखीमुळे पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु अशाप्रकारे बाहेरून येणाऱ्या कामगारांना जर जिल्ह्यात थारा दिला गेला, तर ते जिल्हावासियांच्या दृष्टीने हानिकारक आहे. म्हणूनच सदर जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना कोरेन टाईन करावे, तसेच खनिज विकुन पैसे खायला जिवंत राहू याची पहिली खात्री करा, आणि मगच जहाजात खनिज भरण्यासाठी डंपर वहातूक  सुरू करा. अशाच हावेपोटी,आपलेच खरे करणार तर मरा, व्हा पैसेवाल्या गुलामांची प्रेते...  ,कोरोना वाढत आहे आणि हे दुर्दैव कुठे सुचत आहे. शासनास मदत करा,काही स्वार्थाच्या मागे लागू नका.अशा माफक पैशासाठी सिंधुदुर्ग वासियांच्या जीवाशी खेळू नये, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी कोकण मिरर न्यूज चॅनेलशी बोलताना केली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.