वर्दी असली 'खाकी',तरीही त्यामागे 'देव' बाकी...
स्वतः अपघातग्रस्त असुनही, रुग्णवाहिका चालकाला दिले जेवण.....
सावंतवाडी:-असीम वागळे
कोरोना व्हायरस विरोधात आज सर्वच जण लढा देत आहेत. पण खरी दमछाक होत आहे ती रुग्णवाहिका चालकांची,रूग्णांच्या सेवेस सदैव तत्पर असणारे हे चालक मात्र आज लॉकडाऊनच्या संकटामुळे अन्न -पाणी विसरले आहेत.असाच सावंतवाडी येथील "आई माऊली" रुग्णवाहिकेचा चालक हेमंत वागळे व सहकारी अमित घाडीगावकर हे १६ एप्रिल रोजी सावंतवाडी येथून बेळगावला रूग्ण सोडायला गेले असता,परतीच्या वेळी नेसरी - बेळगाव मार्गावर हासुर चेकपोस्टला रुग्णवाहिका थांबवून तपासणी करण्यात आली. तपासणी नंतर सदर चेकपोस्टवरील पोलीस कर्मचारी श्रीनाथ मनोहर मेघुलकर यांनी चालक हेमंत वागळे याला जेवणाच्या व्यवस्थेबाबत विचारणा केली, मात्र
लॉकडाऊन असल्याने जेवणाची सोय झाली नाही, हे समजताच श्री. मेघुलकर यांनी लागलीच आपल्या दुचाकीने जेवण आणण्यासाठी निघाले. परंतु ते परतत असताना त्यांना अपघात होऊन ते जखमी झाले, तरीही त्याच अवस्थेत त्यांनी हेमंत वागळे व सहकारी यांना जेवण आणून दिले.
पोलीस कर्मचारी श्रीनाथ मेघुलकर यांच्या कर्तृत्वाला आणि माणुसकीला 'कोकण मिरर'टिमचा मानाचा मुजरा.....

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.