Monday, April 20, 2020

खरोखरच कावीळ एक महाभयंकर आजार आहे...

खरोखरंच कावीळ एक महाभयंकर आजार आहे...

पण खबरदारी घेतली तर येईल आटोक्यात..जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर!!!
           
सावंतवाडी :-असीम वागळे 
     सध्या देशात राज्यात व जिल्ह्यामध्ये एप्रिल, मे या महिन्याच्या अखेरीस व पावसाळ्याच्या सुरुवातीला कावीळ या साथीची लक्षणे अनेक रुग्णांना आढळताना दिसतात यामध्ये ताप येणे, सतत संडास व उलट्या होणे, अंगातील रक्त एकदम कमी होणे अशी प्राथमिक लक्षणे काविळीच्या साथीमुळे अनेक रुग्णांना दिसून येतात यासाठी उपाययोजना करण्याची गरज असून असे मत जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी म्हटले आहे.

           खरं म्हणजे कावळ ही साथ अनेकदा एप्रिल-मे या महिन्याच्या अखेरीस व पावसाळ्याच्या सुरुवातीस आपण पित असलेल्या  पाण्यामधून होत असते. आपण पाणी पीत असताना पाण्याची पातळी विहिरीमधून तसेच आपल्याला ग्रामपंचायत किंवा नगरपरिषद पुरवत असलेल्या तलाव किंवा ग्रामपंचायतीतील सार्वजनिक विहिरीच्या पाण्याची पातळी बरेच वेळा कमी होत चालल्याने त्याचा परिणाम पाण्यामधून जंतुसंसर्गामुळे होत असतो.

        यामध्ये पहिले प्रथम यामध्ये विहिरीमध्ये किंवा तलावांमध्ये तुरटी, मीठ, क्लोरीन पावडर पाण्यामध्ये टाकल्यानंतर याचा जंतुसंसर्ग कमी होतो आपण पित असलेल्या पाण्यामधील विहिरीतील गाळ उसपून घेतला पाहिजे आणि हे काम आपण आणत असलेल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या विहिरीमध्ये वर्गणी काढून विहीर मालकाला आर्थिक हातभार लावून विहिरीतील पाणी स्वच्छ करायला मदत केली पाहिजे.

              त्याचप्रमाणे गरम पाणी उकळून थंड करून ते पाणी पिल्याने आपणाला काविळीचा जंतुसंसर्ग होणार नाही यामुळे आपणाला उलट्या, ताप व संडास सतत झाल्याने  रुग्णालयात जाण्याचा प्रश्न उद्भवणारच नाही.
      
         सध्या कोरोना या साथीच्या महामारीमुळे रुग्णालयात वेगवेगळे रुग्ण येत असतात त्याला आपल्याला आळा घालायचा असेल व आपल्या रुग्णांसाठी चार-पाच दिवस रुग्णालयात वेळ घालवायचा नसेल तर याची खबरदारी घेतली पाहिजे.

        कावीळ या साथी वरती अनेक रुग्णांचे नातेवाईक गावठी औषध करत असतात ते फार चुकीचे असून डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण आपल्या रुग्णाला रुग्णालयात घेऊन गेल्यास त्याची व्यवस्थितपणे काळजी घेऊन व निदान करून योग्य तो औषधोपचार केला जातो त्यामध्ये रक्त तपासणी करून काविळीची लक्षणे दिसल्यास जंतुनाशक इंजेक्शने देऊन कावीळ आटोक्यात आणली जाते. रक्त कमी झाल्याने त्या रुग्णाला रक्त दिले जाते. (1.2) पेक्षा खाली काविळीची लक्षणे व निदान झाल्यानंतर तसेच औषधोपचारांचा कोर्स डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्यास अशा रुग्णांना ताप, उलट्या संडास होण्याचे थांबते.

      साधारणपणे गावठी उपचार केल्यानंतर कावीळ रक्तात व किडनीमध्ये (1.2) पेक्षा जास्ती सरासरी (दोन ते अडीच) काविळीचे सूक्ष्म जंतु संसर्ग किडनीमध्ये राहिल्यास अशा रुग्णाची किडनी निकामी होऊन सतत ते आयुष्यभर डायलेसिस करण्याची पाळी अनेक रुग्णांवरती येते यामुळे रक्तचाचणी करून (1.2) पेक्षा कमी कावीळ असल्यास कीडणी निकामी होण्याचा धोका टळतो.

        तसेच शेळे अन्न व अशुद्ध ताक, लस्सी हे पेय पिल्यास सुद्धा कावीळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे गावठी अशुद्ध दारू (मद्यपान) सेवन केल्यास सुद्धा कावीळ होते. त्यासाठी उलट्या, ताप व संडास सतत झाल्याने रुग्णालयात येऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्यतो औषधोपचार घेण्यात यावा व शुद्ध पाणी प्यावे मी सांगितलेली उपाययोजना केल्यास कावीळ जंतुसंसर्ग आपल्या रुग्णाला होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी अशी प्रतिक्रिया जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचिटणीस राजू मसुरकर यांनी व्यक्त केली आहे...

          

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.