Sunday, April 26, 2020

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू हे सुपंथ

एकमेका सहाय्य करू, अवघे धरू हे सुपंथ

इन्सुली येथील निराधार वृद्ध महिलेचे नारायण राणे यांनी केले अंतिम संस्कार त्याचबरोबर अंतिम कार्य 


कार्यप्रित्यर्थ  केले गोरगरिबांना धान्य वाटप


बांदा:-सुविधा वागळे
सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली गावातील क्षेत्रफळ वाडितील वृद्धा गोपिका गोपाळ गावडे यांचे एक वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते. परंतु या वृद्धेचे चिरंजीव कामानिमित्त द.आफ्रिका येथे आहेत,तर स्नुषा मुंबई येथे असल्यामुळे त्यांचे अंतिम विधी तसेच अंतिम कार्य करण्यास कोणाचाही सहभाग नव्हता. पण सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन इन्सुली गावातील माजी पंचायत समिती सदस्य तसेच ज्येष्ठ शिवसैनिक नारायण उर्फ बबन राणे यांनी नाना पेडणेकर यांच्या मदतीने स्वतःहून सदर महिलेचे अंतिम संस्कार तसेच अंतिम कार्य पार पाडले. आज कै.गोपिका गावडे यांच्या दिवस-कार्याच्या निमित्ताने नारायण राणे तसेच नाना पेडणेकर यांनी वाडीतील गोरगरिबांना धान्य वाटप केले.तरी याप्रसंगी नारायण राणे, नाना पेडणेकर, विजय डुगल देवेंद्र भिसे,गोकुळदास पोपकर, वामन बांदिवडेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.