Thursday, April 23, 2020

विलगीकरण कक्षातील त्या रुग्णाचा मृत्यू कोरोना मुळे नाही

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आलेल्या तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या तिन्ही जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.  त्यातील एक अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल निगेटीव्ह असल्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू हा कोरोना मुळे झाला नसल्याचे सिद्ध झाले आहे. इतर दोघांचा मृत्यू इतर आजारांमुळे झाला असल्याचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले.
          आचरा येथे विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या महिलेचा मृत्यू ही कोरोनामुळे झालेला नाही. या महिलेस इतर आजार होते. त्यांच्या उपचारासाठी ही महिला मुंबई येथे गेली होती. तेथून परत आल्यानंतर तिला घरीच अलगीकरण करण्यात आले होते. तीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा स्वॅप तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
          जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या ६२ रुग्ण दाखल आहेत. एकूण २२८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी १९७ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर ३१ नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. सध्या जिल्ह्यात घरीच अलगीकरण करण्यात आलेल्या २७१ व्यक्ती असून संस्थात्मक अलगीकरणामध्ये ६७ व्यक्ती आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण २२७७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
          जिल्ह्यातील निवारा केंद्रातील २६४ व्यक्तींची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.